सामाजिक

लोकसहभागातून फुलवली वनराई; आंबेगाव तालुक्यातील लोणी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम !!

img 20260510 wa0048
img 20260510 wa0047

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी ,ग्रामपंचायत लोणी व आर.एम.डी.फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने लोकसहभाग आणि श्रमदानाने लोणी गावात हायस्कूल शाळेमधील माळरान , वडगावपीर रोडवरील मुक्ताई माळरान व सावता माळी मळा (नांगर तळे) पाबळरोड थापा इ. ठिकाणी सन २०२१ ते २०२३ वर्षात सुमारे ४ हजार ५०० वृक्षाची लागवड झालेली असून संगोपन चालू आहे.

माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी लोणी, ग्रामपंचायत लोणी आणि सेवाभावी संस्था “१४ ट्रीज “ पुणे यांचे वतीनेही लोणी गाव गायरान “पाच टोळी “ विभागात ओसाड माळरानावर गत वर्षी १०००० हजार वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आंबा, चिंच, लिंब,कवठ, पिंपळ,आवळा अशा देशी वृक्षांची लागवड आहे.

img 20260510 wa0044
img 20260510 wa0045

सुमारे ४०००० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.लोणी गाव आणि परिसरात जास्तीत जास्त वृक्षलगवड व्हावी असे स्वप्न माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी व गावचे सर्व ग्रामस्थ यांचे असून सेवाभावी संस्था “१४-ट्रीज” पुणे चे व्यवस्थापक अनंत तायडे हे वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रयत्नांची पराकष्टा करीत आहेत.

img 20260510 wa0040

लोणीकरांनी वृक्षांची चांगल्या प्रकारे जोपासना केली असून, झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे.ओसाड पडलेली माळराने आता हिरव्यागार झाडांनी भरून गेले आहेत. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती ” या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खऱ्या अर्थाने मूलमंत्र लोणीकरांनी स्वीकारला आहे.

प्रत्येकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावावं हे झाड भविष्यात आपल्याच सावली, हवा आणि जीवन देईल, वृक्षारोपण हे निसर्गाचं खरं पूजन आहे. असे प्रतिपादन लोणी ग्रामस्थांनी केले आहे.

img 20260510 wa0037
fb img 1774661449199

Related posts

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे वादळी वारा आणि पावसाने झाले शेतकऱ्यांचे नुकसान !!

Chief Editor

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे हार्डवेअर अँड नेटवर्किंग कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

Canine Distemper Virus (CDV) — वन्यजीवांसाठी वाढता अदृश्य धोका !!

Chief Editor

Leave a Comment