सामाजिक

वडगावपीर येथील राजगुडे वस्ती वर बंद असलेल्या घरावर चोरट्यांचा डल्ला!!

1009444508

पंचनामा प्रतिनिधी – वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील वडगावपीर – पाबळ रस्त्यावरील राजगुडे वस्तीवरील बबन पंढरीनाथ राजगुडे यांच्या घरी शनिवार दि.९ /५/२०२६ रात्री दरवाजाची कडी कोंडा तोडून चोरटयांनी घरामध्ये प्रवेश केला व पत्राच्या पेटी मधील दहा हजार रुपये व सोन्याचे काही मणी, व खुंटी वर अडकवलेल्या कपड्या मधिल पाच हजार रुपये असा सुमारे पंधरा ते वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास पारगाव (कारखाना ) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

गावामध्ये येणारे फेरीवाले,पर राज्यातील कामगार यांच्यावर ध्यान ठेवावे. चोर बंद घरे शोधून चोऱ्या करत आहेत.ग्रामस्थांनी फेरीवाले, विक्रेते लोकांवरती नजर ठेवावी,काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

fb img 1774661444136

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील डॉ.शिवाजी थिटे यांच्या ओम हॉस्पिटलच्या शिरपेचात मनाचा तुरा!!!

Chief Editor

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव शिंगवे) येथील घोडनदी परिसरातील विजेचे खांब झाले दुरुस्त !!

Chief Editor

धामणी (ता.आंबेगाव) येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment