सामाजिक

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश!!

1009479416
1009479417

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे, बांगरवाडी या सीबीएसई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

१४ वी पामा इंडिया अबॅकस आणि मेंटल अरिदमॅटिक राष्ट्रीय स्पर्धा २०२६ ही शिर्डी येथे उत्साहात पार पडली. देशभरातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील बेल्हे बांगरवाडी येथील समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचा गौरव वाढविला. अशी माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य श्री. सतीश कुऱ्हे यांनी दिली.

समर्थ गुरुकुलमध्ये पामा इंडिया संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा अबॅकस प्रशिक्षण उपक्रम अत्यंत यशस्वी ठरत असून त्याचाच प्रत्यय विद्यार्थ्यांच्या या यशातून दिसून आला आहे.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
चॅम्पियन :
१) पारस मोरे
२) स्मितल निमसे
३) स्वरा देशमाने
प्रथम विजेते :
१) स्वरा मते
२) शरण्या गुंजाळ
३) नूर आत्तार
द्वितीय विजेते :
१) मृण्मयी अल्हाट
२) हिंदवी आग्रे
३) हर्षद गुंजाळ
४) देवांश निमसे
५) आर्या देशमाने
६) आरोही आवटी
७) अर्णवी गाडगे
तृतीय विजेते :
१) ज्ञानेश्वरी डावखर
२) दूर्वा कणसे
या सर्व विद्यार्थ्यांना अक्षरशिल्प पामा इंडिया यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सारिका काळे व वेदिका आरगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतरावजी शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेकभाऊ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर, विश्वस्त सारिका ताई शेळके, समर्थ गुरुकुलच्या संचालिका सौ. स्नेहल ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रदीप गाडेकर, पर्यवेक्षक हरिश्चंद्र नरसुडे, मातेले सर तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

fb img 1774661444136

Related posts

समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड !!

Chief Editor

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – पारगाव, दत्तात्रयनगर येथे बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा !!

Chief Editor

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री.पीरसाहेब-हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment