सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला “मोरडे फूड प्रॉडक्ट्सचे” संस्थापक मा. श्री. हर्षल मोरडे यांच्या वतीने पाच संगणक संच उपलब्ध !!

img 20260224 wa0663

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला “मोरडे फूड प्रॉडक्ट्सचे” संस्थापक मा. श्री. हर्षल मोरडे यांच्या वतीने पाच संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने सहकार्य केले.

डिजिटल युगात विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन, महालक्ष्मी कंट्रक्शन चे सर्वे- सर्वा मा.श्री. विशाल नाथा वाळुंज यांच्या प्रयत्नातून संगणक लॅब उभारण्यासाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेट वापर, तसेच विविध शैक्षणिक सॉफ्टवेअरचा अभ्यास करता येणार आहे.

या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित होण्यास मदत मिळेल.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष श्री. गुलाब वाळुंज, मा.अध्यक्ष वैभव सुक्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शेखर सुक्रे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शेठ वाळुंज,आई मेडिकलचे सर्वे-सर्वा श्री वैभव शेठ वाळुंज यांनी मोरडे फुड्स कंपनीचे आभार मानले आणि, ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळाल्याची भावना व्यक्त केली.

fb img 1771121534243

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) गावाने टाकली कात !! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानानिमित्त गावचे रूपडे पालटले!!

Chief Editor

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त १० ते १५ जुलैदरम्यान पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

Chief Editor

Leave a Comment