सामाजिक

लोणी (धामणी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला बाल आनंद मेळावा !!

img 20260224 wa0629
img 20260224 wa0629

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.

मेळाव्यामध्ये खाऊ गल्ली, बाजार स्टॉल, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका मोटे मॅडम यांनी सांगितले की,मुलांमध्ये व्यवहार ज्ञान,आत्मविश्वास,नेतृत्व गुण,संवाद कौशल्य, जबाबदारीची जाणीव या उद्देशाने या बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी भाजीपाला, फळभाज्या, विविध प्रकारच्या घरगुती खाद्यपदार्थ त्यामध्ये दक्षिणात्य खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ, विविध प्रकारचे चॉकलेट्स, संतुलित पदार्थ इत्यादी पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. पालकांनी या बाल मेळाव्याचे कौतुक केले.

यावेळी लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सावळेराम नाईक ,मा. उपसरपंच शिवाजीराव गायकवाड, समाजभूषण कैलासराव गायकवाड, ग्रामपंचायतचे मा.सदस्य रवींद्र रोकडे, राहुल भागवत, विशाल वाळुंज, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अधिकारी वैभव लंके, दिगंबर तात्या सोनवणे, व शिक्षण समितीचे अध्यक्ष गौरव रोकडे, उपाध्यक्ष सोनाली खंडागळे, बळशीराम वाळुंज, निर्मला कदम, मंगेश थोरात,कांचन गायकवाड,योगेश वाळुंज,अस्मिता जाधव,सोमनाथ वाळुंज वर्षा आढाव, यशवंत वाळुंज श्री भैरवनाथ विद्याधाम शाळेचे प्राचार्य ढगे सर, तांबोळी सर व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्याध्यापक मोबीन मुंडे सर व त्यांचे शिक्षक सहकारी कदम सर, चौधरी सर,मोटे मॅडम यांनी या बाल आनंद मेळाव्यासाठी विशेष प्रयत्न केले.

fb img 1771121541695

Related posts

रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा- चेतन कलशेट्टी ; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलच्या चिमुकल्यांनी बनवल्या हस्तनिर्मित राख्या ;वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश !!

Chief Editor

Leave a Comment