सामाजिक

समर्थ संकुलामध्ये ऊर्जा बचत व व्यवस्थापन-एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !!

img 20260225 wa0197
img 20260225 wa0196

पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,विद्यार्थी विकास मंडळ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “Energy Audit and Management” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच करण्यात आले होते.

कार्यक्रमावेळी प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांच्या हस्ते प्रा.दसपुते यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा.प्रमोदजी दसपुते यांनी ऊर्जेचे ऑडिट कसे करावे,त्याचे शास्त्रशुद्ध नियोजन कसे आखावे तसेच ऊर्जा संसाधनांचे प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापन कसे साध्य करता येईल तसेच ऊर्जा बचत, खर्च नियंत्रण, कार्यक्षमता वाढ आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ऊर्जा ऑडिटचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जा व्यवस्थापनाच्या व्यावहारिक बाबी समजून घेण्यास मोठी मदत झाली.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.

ऊर्जा बचत, कार्यक्षमता वाढ आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर ,मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा.अमोल खतोडे,डॉ.संदीप नेहे,प्रा.कौस्तुभ मेहर,प्रा.अमोल भोर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.निलेश नागरे यांनी केले तर आभार डॉ.शरद पारखे यांनी मानले.

fb img 1771121541695
fb img 1771121534243

Related posts

न्यू एरा हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Chief Editor

श्रावणी सोमवारनिमित्त जारकरवाडीत फराळ वाटपाचे आयोजन !!

Chief Editor

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा !!

Chief Editor

Leave a Comment