सामाजिक

TVS कंपनी च्या पुढाकारातून पहाडदरा येथील ठाकर,आदिवासी वस्तीसाठी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन !!

1009887235
1009887235

पंचनामा प्रतिनिधी – पहाडदरा ता.आंबेगाव जि. पुणे येथील ठाकरवाडी आदिवासी वस्तीतील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या उद्देशाने TVS कंपनी च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे फील्ड डायरेक्टर श्री. योगेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

TVS मोटर्स कंपनीच्या समाज बांधीलकी (CSR) उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टने (SST) हाती घेतलेल्या विद्यमान सार्वजनिक विहिरीतील आडवे बोर घेणे, तसेच वस्तीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे, विहिरीवरती संरक्षक जाळी बसविणे, पंप घर, सोलर पंप बसवणे आणि पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे अशी कामे या प्रकल्पात करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आदिवासी वस्तीतील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे सर्व ग्रामस्थ आणि TVS चे अधिकारी यांनी एकत्र येऊन विधिवत पूजन करून कामाला शुभारंभ केला. यावेळी उपस्थित महिलांनी विहिरीचे पूजन करत श्रीफल अर्पण केले. आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी सरपंच मच्छिंद्र वाघ, भगवान वाघ, उपसरपंच कैलास वाघ, पोलीस पाटील नीलेश भालेराव,भाऊ साहेब कुरकुटे बाळासाहेब वायकर, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, गुलाब केदारी, विलास पडवळ, दीपक कडाळे, प्रदीप केदारी, दिलीप केदारी, डी. एम. वायकर,प्रमोद वाघ यांचा समावेश होता. तसेच बचत गटातील महिला आणि समस्त ठाकर ग्रामस्थही मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

TVS कंपनी चे अधिकारी श्री सोमनाथ काटकर, श्री शाहरुख शेख, सौ सिंधू वायकर, श्री सतीश ढेरंगे उपस्थित होते.

या भागातील समस्या सोडवण्यासाठी TVS कंपनी सातत्याने कार्यरत आहे. तसेच या प्रकल्पामुळे वस्तीतील नागरिकांची उनळ्यातील भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास श्री योगेश्वर पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामस्थांनी TVS कंपनीच्या या उपक्रमाचे स्वागत करत कंपनी प्रती कृतज्ञता व्यक्त केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वस्तीतील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

1009828026
1009877982
1009881998

Related posts

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

Chief Editor

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील पक्षीप्रेमी प्रदिप आदक यांनी पक्ष्यांसाठी बसवले बर्ड फूड फिडर !!

Chief Editor

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

Leave a Comment