सामाजिक

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेच्या मागणीची एसटी प्रशासनाकडून दखल !!

1009888443

पंचनामा प्रतिनिधी- मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याच्या भाजपा पूर्व मंडलाचे अध्यक्ष किरण वाळुंज यांच्या मागणीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दखल घेतली असून, संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

भाजपा आंबेगाव तालुका अध्यक्ष श्री.किरण बाबाजी वाळुंज यांनी या दोन्ही मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याबाबत मा. परिवहन मंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांना सुलभ व नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांनी ही मागणी केली होती.परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयामार्फत सदर निवेदन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक पुणे विभागा नियंत्रका कडे आवश्यक कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आले असून,योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे महामंडळा कडून दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

1009828025

मंचर–लोणी–शिरूर तसेच राजगुरूनगर–पाबळ–लोणी किंवा बेल्हा- जेजुरी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील हजारो विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, नोकरदार व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, नियमित व सर्वसामान्यांना परवडणारी होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, एसटी प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याबद्दल श्री.किरण बाबाजी वाळुंज यांनी मा. परिवहन मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. संबंधित मार्गांवर लवकरात लवकर शटल बस सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

1009828034
1009878978

Related posts

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

Chief Editor

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे श्री धर्मनाथ महाराज यात्रा (बिज) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

समर्थ संकुलात वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर मेजर रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन !!

Chief Editor

Leave a Comment