सामाजिक

पंचायत समिती चांदवड व ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE- 136) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न !!

1010682901
1010682901

पंचनामा चांदवड प्रतिनिधी – चांदवड येथील पंचायत समिती चांदवड व ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE- 136) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती,चांदवड येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी उपस्थितांना गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनीमार्गदर्शन करतांना रक्तदान करण्याचे वैज्ञानिक कारण विषद करून रक्तदानाचे फायदे व महत्व उपस्थितांना समजावून सांगितले तसेच यावेळी असंख्य रक्तदात्यानी सहभाग नोंदवला असून या अनोख्या उपक्रमास महिलांनीही उस्फूर्त सहभाग प्रतिसाद देत एकूण 37 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.

यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयचे पीआरओ मंगेश राठोड,पूजा राठोड आदींनी सहकार्य लाभले.यावेळी सहा. गटविकास अधिकारी छोटु थोरात, विस्तार अधिकारी सुनील बच्छाव,दिनकर कुमावत, किशोर लोहार, संघटना पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी,सरपंच/प्रशासक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी किरण शिंदे, (तालुका व्यवस्थापक) यांनी व पंचायत समिती सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेतले.

1010543616

Related posts

जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेत पाबळ शाळेचे उल्लेखनीय यश !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश!!

Chief Editor

प्रजापती बम्हाकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय पारगाव (शिंगवे) येथे व्यसनमुक्ती अभियान संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment