सामाजिक

धामणीत शुक्रवारी संपन्न होणार खंडोबा-बाणाई विवाह सोहळा !!

img 20260824 wa0725
1010686284

लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी खंडोबा देवस्थान मंदिरात श्रावण पौर्णिमा (रक्षाबंधन)निमित्त शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) पहाटे पारंपरिक बेल अर्पण, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक तसेच श्री खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे पाच वाजता बारा यजमानांच्या हस्ते मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंगास दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री खंडोबा व बाणाई यांच्या देखण्या मुखवट्यांना महिला भाविकांच्या हस्ते हळद लावण्यात येईल. मुखवट्यांची मिरवणूक काढल्यानंतर पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न होणार असल्याचे सेवेकरी मंडळींनी सांगितले.

1010685932

पुरातन मार्तंडविजय व मल्हारी सप्तशती या ग्रंथांमध्ये श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह श्रावण पौर्णिमेला उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून नळदुर्ग येथे साध्या पद्धतीने मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत झाल्याचा उल्लेख आढळतो. जेजुरी, नळदुर्ग यांसह विविध खंडोबा मंदिरांमध्ये ही विवाह परंपरा आजही उत्साहात साजरी केली जाते.

धामणी येथील या पारंपरिक विवाह सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ व देवस्थान सेवेकरी मंडळींनी केले आहे.

1010631744
1010457105
1010690637

Related posts

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी !!

Chief Editor

धामणीत बैलजोड्या निर्मितीला वेग; पुणे-मुंबईसह यवतमाळपर्यंत मागणी ; भाद्रपदी बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन हजार बैलजोड्या तयार; ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपणाऱ्या कलेला बाजारपेठ !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न..

Chief Editor

Leave a Comment