सामाजिक

मंदिरात रोख रक्कम दान करण्याच्या बहाण्याने महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले !!

1009495336
1009493345

पंचनामा प्रतिनिधी – मंदिरात रोख रक्कम दान करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत महिलेचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दोन चोरट्यांनी लांबविले आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपतीच्या पायथ्याशी असलेल्या दुकानात घडली असून मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपती मंदिराच्या पायथ्याशी मंगेश शेटे यांचे पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांची आई लताबाई या दुपारच्या वेळी दुकानावर असताना अज्ञात दोन इसम दुचकीवरून आले. शेटे यांच्याकडून शंभर रुपये सुट्टे करून घेण्यात आले. दुकानात कोणीच नाही हे पाहून त्यातील एकाने आम्हाला दोन हजार रुपये मंदिरात दान करायचे आहे ते तुमच्याकडे देतो असे म्हणून दोन हजार रुपये टेबलवर ठेवले. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हातातील अंगठी सदर रकमेवर ठेवून दिली. लताबाई शेटे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सदर पैशावर ठेवण्यास संबंधित चोरट्यांनी भाग पाडले. त्यानंतर लताबाई शेटे यांना दर्शन घेण्यास सांगण्यात आले.सर्व ऐवजाची पुडी बांधून त्यांनी सोबत आणलेल्या लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवली.

यादरम्यान हातचलाखी करत चोरट्यांनी मंगळसूत्र बाजूला काढत खिशामध्ये ठेवले.पिशवीमध्ये अगोदरच उदबत्ती व पूजेचे साहित्य होते. ही पिशवी काउंटरवर ठेवून सदर साहित्य मंदिराकडे पोहोच करा असे सांगून चोरटे दुचाकीवरून फरार झाले.

शेटे यांनी पिशवी खोलून पाहिली असता आतमध्ये सोन्याचे मंगळसूत्र नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलगा मंगेश याला माहिती दिली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

मंचर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. हे सराईत चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून असे प्रकार केले जातात. या घटनेत लताबाई शेटे यांचे पाच लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

fb img 1774661444136

Related posts

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर सह बोरी-आळेफाटा, घोडेगाव, चास-कडेवाडी आणि चिंचोली (कोकणे) येथे भव्य स्वच्छता अभियान संपन्न…!!

Chief Editor

पंचनामा विचारधन – कन्यादान

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) येथे रमजान ईद उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment