सामाजिक

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

1009491539
1009491539

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बेल्हे-बांगरवाडी येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅम्पस डायरेक्ट प्रा.राजीव सावंत उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ,समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य भूतकर सर,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ.रमेश पाडेकर,डॉ.शिवाजी खेमनार, यशवंत फापाळे तसेच नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.प्रा.सानिया शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.हर्षदा गोफणे यांनी यंदाच्या जागतिक परिचारिका दिनाच्या घोषवाक्याचे महत्त्व स्पष्ट करत परिचारिकांची समाजातील भूमिका अधोरेखित केली.यावेळी महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रा.राजीव सावंत यांनी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा परिचारिका क्षेत्रावर झालेला प्रभाव विशद केला.तसेच नर्सिंग स्टाफचे आरोग्य व्यवस्थेतील महत्त्व स्पष्ट केले.परिचारिका दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परिचारिका क्षेत्रातील सेवाभाव, शिस्त आणि जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात उत्कृष्ट परिचारक बनून समाजसेवा करण्याचे आवाहन केले.

समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्वांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देत परिचारिकांचे समाजासाठी असलेले योगदान आणि सेवाभाव अत्यंत महत्वाचा असल्याचे अधोरेखित केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.किशोर बोऱ्हाडे ,प्रा.हर्षदा गोफणे ,आयेशा जमादार,सानिया शेख,उज्वला साळवे,स्नेहल येवले आदींनी उत्कृष्ट नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूनम कसबे व तैबा पटेल यांनी तर प्रा.सानिया शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

fb img 1774661444136

Related posts

धामणी (लोणी) येथे संपन्न झाले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर !!

Chief Editor

विनोद व अभिनयसम्राट तमाशाफडमालकमा. वसंतराव विश्वासराव नांदवळकर….

Chief Editor

युवा ताशावादक जालिंदर शेवाळे यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

Leave a Comment