सामाजिक

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली; पर्यटकांना प्रवेश तात्पुरता बंद !!

img 20260705 wa0372

पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड किल्ला परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांचा प्रवेश तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून घाटरस्ते, किल्ले, डोंगराळ भाग आणि धबधब्यांच्या परिसरात भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी अशा ठिकाणी जाणे टाळावे तसेच कोणत्याही प्रवासापूर्वी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाचे अधिकृत अपडेट तपासावेत.

विशेषतः विकेंडच्या काळात सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर तसेच इतर डोंगराळ पर्यटनस्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर हवामान आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.

1009850407

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि समस्थ ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला संपन्न !!

Chief Editor

उष्णतेचा कहर कायम; पण आजपासून पावसाची शक्यता !!

Chief Editor

शिक्षण व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांना निवेदन !!

Chief Editor

Leave a Comment