सामाजिक

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी,खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; जलसाठा जवळपास पूर्ण क्षमतेकडे !!

1010063362

पंचनामा प्रतिनिधी – पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरण समूहाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ५ जुलै २०२६ रोजी उपलब्ध माहितीनुसार, धरणातील सध्याचा पाणीसाठा १९.३२ TMC इतका नोंदवण्यात आला असून, धरण समूहाची एकूण क्षमता २१.७५ TMC आहे.

ही वाढ पुणेकरांसाठी निश्चितच आनंदाची बाब असली, तरी प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठ, पूल किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे.

🌧️ पावसामुळे जलसाठा वाढणे ही शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सकारात्मक बाब असली, तरी सुरक्षिततेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

⚠️ महत्त्वाचे आवाहन: ✅ नदीकाठावर सेल्फी किंवा फिरण्यासाठी जाऊ नका.
✅ धरण परिसरात अनावश्यक गर्दी टाळा.
✅ हवामान व प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
✅ आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.

1009850407

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा,विविध विभागांत शिक्षकांचा गौरव; गुणवत्तापूर्ण शैक्षणिक योगदानाबद्दल प्राध्यापकांचा सन्मान !!

Chief Editor

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या १३ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप !!

Chief Editor

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली !!

Chief Editor

Leave a Comment