सामाजिक

प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र येळवंडे यांच्या हस्ते माहेर आश्रमात १०० महिलांना साडी वाटप !!

1010065508

पंचनामा प्रतिनिधी – वढू बुद्रुक (ता.शिरूर जि.पुणे ) येथे निराधार व गरजू महिला, पुरुष आणि बालकांसाठी प्रेम, आपुलकी व सुरक्षिततेचे माहेरघर ठरलेल्या माहेर आश्रम, वढू बुद्रुक येथे समाजोपयोगी उपक्रमांतर्गत १०० गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.
हा उपक्रम ऑनररी डॉक्टरेट, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित तसेच प्रसिद्ध उद्योगपती श्री. रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे (चऱ्होली बुद्रुक) यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी आश्रमातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांनी हा सन्मान प्रेमाने स्वीकारत श्री. येळवंडे यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली

यावेळी श्री. येळवंडे यांनी सांगितले की, “समाजातील गरजू, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. समाजाने अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहून सेवा कार्यात सहभागी व्हावे.”

माहेर आश्रम ही संस्था निराधार महिला, अनाथ बालके, ज्येष्ठ नागरिक, मानसिकदृष्ट्या आजारी महिला-पुरुष यांच्या पुनर्वसनासाठी गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांद्वारे समाजात आशेचा किरण निर्माण करत आहे.

या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देण्याचा श्री. रवींद्र येळवंडे यांचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा सेवाभावी संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

1009850407

Related posts

ज्योती गोरडे यांना स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

मेरा युवा भारत जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment