सामाजिक

मेरा युवा भारत जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न !!

1010066215

पंचनामा प्रतिनिधी – जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे मेरा युवा भारत जिल्हा सल्लागार समितीची बैठक निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली ३ जुलै रोजी संपन्न झाली.

बैठकीत आशिष शेटे, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत तथा जिल्हा युवा सल्लागार समिती सचिव यांनी माय भारत उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करून आगामी वर्षासाठीचा कार्यक्रम आराखडा समितीसमोर मांडला.

यावेळी १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्हाभर माय भारत नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग नोंदविण्यासाठी विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून जनजागृती व नोंदणी मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली.

1010066215

बैठकीस भाऊसाहेब कारेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी, युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, सागर सरगर (कौशल्य विकास व रोजगार अधिकारी), शोभा पालवे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिनिधी, तसेच युवा तसेच सामाजिक संस्था प्रतिनिधी आम्रपाली चव्हाण, जयश्री पाथरकर, स्वप्नील शिंदे, बजरंग बोरकर, धीरज वायाळ, चैतन्य गरजे, आदी उपस्थित होते.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर उपस्थित सदस्यांनी सकारात्मक चर्चा करून My Bharat उपक्रम जिल्ह्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

Related posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Chief Editor

माळीन फाटा-असाणे रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची व प्रवाशांची मागणी !!

Chief Editor

Leave a Comment