सामाजिक

भिर्रर्र…. भिर्रर्र….झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त पहाडी आवाजात संपन्न झाली वडगावपीर येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत!!

img 20260314 wa0314

पंचनामा प्रतिनिधी – भिर्रर्र…. भिर्रर्र….झाली…. उचल की टाक…. सेकंद…. अशा भारदस्त पहाडी आवाजात तापलेल्या उन्हात हजारो बैलगाडा शौकिनांनी वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सवानिमित्त आयोजीत केलेल्या बैलगाडा शर्यतीचा आनंद लूटला.

या शर्यतीमध्ये एकूण १७४ बैलगाडा मालकांनी भाग घेतला होता.या बैलगाडा शर्यतीत पहिल्या फेरीतील एकूण गाडे:-१४४
फायनल मध्ये भाग घेतलेले गाडे:-१२
तिसऱ्या वर्षाचे मानकरी गाडे:-१८ असे एकूण पळालेले गाडे १७४,
या बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजाचा मानकरी माजी सरपंच वसंत गहिणजी पडवळ ( सविंदणे )
२० फुटावरील कांडे :- कै.भागाजी मनाजी करंजखिले व कै. लक्ष्मणनाना बाळाजी खळदकर-जुगलबंदी( जातेगाव )

प्रथम क्रमांकात एकूण २९ गाड पळाले व पहिल्यात पहिला रितेश चंद्रकांत शिंदे (अवसरी बुद्रूक )
द्वितीय क्रमांकात एकूण ६५ गाडे पळाले.

दुसऱ्यात पहिला राजेंद्र गणपत होले ( खेड )तृतीय क्रमांकात एकूण २५ गाडे पळाले,
तिसऱ्यात पहिला कै.विष्णू रामकृष्ण वाळुंज(लोणी) चतुर्थ क्रमांकात एकूण १० गाडे पळाले व
चौथ्यात पहिला ओंकार अंकुश पोखरकर (वडगावपीर )

तसेच फायनल मध्ये विजेते बैलगाडे,
फायनल मध्ये भाग घेतलेले एकूण गाडे :-१२
प्रथम क्रमांक तीन गाडे मल्हारी शिवराम जगताप व बाळासाहेब हरीभाऊ जाधव,बारकुशेठ सखाराम जगताप व मारुती विष्णू डोके (संत सावता माळी बैलगाडा संघटना),
बाबूशेठ संजय पोखरकर व विकास ज्ञानेश्वर पंचरास.

द्वितीय क्रमांक दोन गाडे
विनायक सुदाम ढोबळे व भगवान बाबुराव गावडे,पोपटराव गोविंद आदक व कृष्णा विजय मेरगळ.
तृतीय क्रमांक दोन गाडे कचरशेठ रामभाऊ पानमंद (चांदोह), तुकाराम सावकार जाधव व शरद मारुती आदक (वडगावपीर)

तसेच सलग तिसऱ्या वर्षाचे मानकरी विजेते ठरलेले १४ गाडे पळाले अशी माहिती माहिती माजी सरपंच संजय पोखरकर व गोरक्ष आदक यांनी दिली.

या बैलगाडा शर्यतीचे नियोजन वडगावपीर-मांदळेवाडी ग्रामस्थांनी केले होते.तर यात्रा काळात पारगाव-कारखाना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील बैलगाडा शर्यतीतील एक रोमहर्षक क्षण

img 20260314 wa0314
fb img 1771121541695

Related posts

साकोरे मळा (शिंगवे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टी.व्ही.ची भेट !!

Chief Editor

वडगावपीर येथील राजगुडे वस्ती वर बंद असलेल्या घरावर चोरट्यांचा डल्ला!!

Chief Editor

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

Chief Editor

Leave a Comment