सामाजिक

माॅडेल स्कुल शिंगवे शाळेचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण !!

img 20260315 wa0095

पंचनामा प्रतिनिधी- समीर गोरडे

पारगाव – केंद्र शासनाच्या समग्रशिक्षा अभियानांतर्गत शाळांना मिळणाऱ्या विविध अनुदानाचा विनियोग आणि उपलब्ध भौतिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक अंकेक्षणाच्या (सोशल ऑडिट) पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दोनदिवसीय तपासणी नुकतीच पूर्ण झाली.

शिक्षण विभागामार्फत नियुक्त पथकातील विशाखा दाभाडे वर्धा आणि अस्मिता दादमल चंद्रपूर यांनी दोन दिवस शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी शाळेला प्राप्त झालेल्या निधीचा वापर नियोजित आणि पारदर्शक पद्धतीने झाला आहे का ? यासंदर्भातील कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वर्गखोल्यांची तसेच भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ‘निपुण महाराष्ट्र’ आणि ‘विद्यार्थी सुरक्षा’ यांसारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.

मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी शाळेतील उपलब्ध सुविधांची माहिती पथकास दिली. त्यानंतर पथकाने छायाचित्रे घेऊन संबंधित माहिती संग्रहीत व अपलोड केली. अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतर पथकाने शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांसमोर अहवालाचे वाचन केले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्ष रेखा पाबळे, मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर, जालिंदर पोंदे, श्रीकृष्ण डुकरे, विलास भोर, अशोक लोखंडे, सुभाष इंदोरे, वैजयंती लोखंडे, संगीता इंदोरे,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे येथे सामाजिक अंकेक्षण पथकाचे स्वागत करताना मुख्याध्यापक व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती.

img 20260315 wa0095
fb img 1771121534243

Related posts

लोणी (धामणी) येथे जलतारा उपक्रमाची सुरुवात !!

Chief Editor

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या २०२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड ; उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी; मेकॅनिकल विभागाची शंभर टक्के प्लेसमेंट !!

Chief Editor

Leave a Comment