
पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळावा अर्थात आठवडे बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांनुसार आकडेमोड करता यावी, बाजारभाव ठरवता यावा ,आपल्या व्यावहारिक जीवनात त्यांचा वापर करता यावा या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक पारगाव (शिंगवे) शाळेत आठवडे बाजार घेण्यात आला होता.



यावेळी पंचायत समिती सदस्य व लोकनियुक्त सरपंच सौ.श्वेता ढोबळे, मा.सरपंच बबन ढोबळे,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.बजरंग देवडे,चेअरमन मा.दतात्रय वाव्हळ, उपसरपंच विठठल ढोबळे,भीमाशंकर कारखान्याचे संचालक मा.श्री माऊली असवारे, ग्रामपंचायत सदस्य किरणभाऊ ढोबळे, काळुराम लोखंडे,मधुकर दातखिळे,भागचंद पोंदे,जयराम ढोबळे, माऊली देवडे,शाम बारगळ, विशाल लोखंडे, सुदाम चककर, अनिल शेवाळे, बाबाजी पुंडे,संदिप दातखिळे,प्रशांत पो़दे,सुर्यकांत बोंबे,सुनिल चांगण,शिवाजी लोखंडे सर,विवेक चव्हाण, शंकर देवडे,सचिन दातखिळे व अनेक ग्रामस्थ व शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी संघ, महिला तक्रार निवारण समिती, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थीत सर्वांचे सगळयांचे आभार मुख्यध्यापक संतोष लबडे सर व वळसे सर यांनी मानले ….




