सामाजिक

कलावंतांचे अप्रकाशित साहित्य शासनाने प्रकाशित करावे – अरुण खरात

img 20260228 wa0619
img 20260228 wa0619

पंचनामा विशेष – महाराष्ट्रातील लोककलावंतांनी लिहिलेले वगनाट्य, लावण्या, लोकगीते, भक्तीगीते, गवळण इत्यादी अप्रकाशित साहित्य शासनाने प्रकाशित करावे अशी अपेक्षा लोककला व लोक कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी व्यक्त केली आहे.

२७ नोव्हेंबर हा दिवस ज्येष्ठ कवी, नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन पित्यार्थ मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सध्या शासनाकडून मराठी भाषेच्या जतन संवर्धन प्रचार व प्रसारा करता विविध उपक्रम राबविले जात आहे त्यात पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे मात्र शासनाने लोककलावंतांनी लिहिलेले वगनाट्य, लावण्या, लोकगीते, भक्ती गीते, गवळण तसेच इतर प्रकारचे साहित्य प्रकाशित केल्यास लोकसाहित्याचा हा अनमोल ठेवा तरुण पिढीपर्यंत पोहोचेल व त्यात अनेक लोककलांनाही नव संजीवनी भेटून त्या उजेडात येतील.

fb img 1771121541695

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असून ही बाब आपल्यासाठी अत्यंत गौरवाची आहे. अनेक लोककलावंतांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कलेसाठी अर्पण करून आपल्या मराठी मायबोलीचा उद्धार केला आहे. त्यांनी लिहिलेल्या आपल्या साहित्यातून येथील लोकसंस्कृती, लोक परंपरा याची मांडणी केलेली आहे. मात्र हे साहित्य सध्या त्यांच्या दप्तरी धुळखात पडलेले असून काही दिवसांनी ते कागद जीर्ण होऊन कालौघात ते नामशेष होईल.

खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा असेल तर शासनाने लोककलावंतांनी लिहिलेले हे साहित्य पुस्तकातून प्रकाशित करावे अशी मागणी लोककला व लोक कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी ई-मेल द्वारे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब यांच्याकडे केली आहे.

Related posts

सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची “मानद वन्यजीव रक्षक ” या पदी नियुक्ती !!

Chief Editor

झाडांच्या गर्दीत आणि खड्ड्यात हरवला आहे जारकरवाडी फाटा ते लोणी (धामणी) रस्ता !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न..

Chief Editor

Leave a Comment