सामाजिक

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने जारकरवाडी येथे “आनंद अनुभूती शिबिर” होणार संपन्न !!

1009786492

पंचनामा प्रतिनिधी – आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने जारकरवाडी येथे “आनंद अनुभूती शिबिर” आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये सहभागी नागरिकांना योग, प्राणायाम, ध्यान आणि जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकविण्यात येणार आहे.मानसिक तणावमुक्त जीवन, उत्तम आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सुदर्शन क्रिया ही श्वासावर आधारित प्रभावी पद्धत असून ती 100 पेक्षा अधिक आजारांवर सकारात्मक परिणाम करणारी मानली जाते. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्याचे तंत्र, मनःशांती मिळविण्याचे मार्ग तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे.
अनुभवी प्रशिक्षक रचना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून 23 जून ते 28 जून या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कार्यक्रम होणार आहे.

शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर मंदिर (धामणी खिंड), जारकरवाडी येथे करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9975950823, 9730569148 किंवा 9209375334 या क्रमांकावर संपर्क साधावा.

1009777264
1009760330
1009760332
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521

Related posts

सिझन पूर्वी तमाशाची रूपरेषा आखून सर्वत्र त्याची अंमलबजावणी करावी – मा.मुसाभाई इनामदार

Chief Editor

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

Chief Editor

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती नेहरू विद्यालयात वृक्षारोपन करून साजरी !!

Chief Editor

Leave a Comment