सामाजिक

पारगाव (कारखाना) येथील खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचरित्र पारायणाची सांगता !!

1010392740
1010392740


पंचनामा प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा निमित्त पारगाव (कारखाना) येथील श्री सोनमाळ खंडोबा मंदिरात सात दिवसीय गुरुचरित्र पारायण व गृहपठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा धार्मिक उपक्रम दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत दररोज पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत उत्साहात पार पडला.
या पारायण सोहळ्यात पारगाव परिसरातील सुमारे ७० ते ८० महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी भक्तिभावाने सहभागी होत गुरुचरित्राचे पारायण केले. पुरोहित विजय (काका) कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, राजेंद्र गवारी यांच्यासह परिसरातील अनेक महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे, महिला सेवेकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने लाभला. कार्यक्रमाच्या सांगता समारंभात सर्व महिला सेवेकऱ्यांच्या शुभहस्ते श्रींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री स्वामी समर्थांचा जयघोष करत धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली.

Related posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

Chief Editor

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा ; मागण्यांबाबतचे विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय !!

Chief Editor

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ६५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

Chief Editor

Leave a Comment