सामाजिक

पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी !!

1010393316
1010393316

पंचनामा प्रतिनिधी – “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आई-वडील हेच आपले काशी आणि पंढरी असून त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प. वैभव महाराज शिंदे यांनी केले.

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी त्यांनी गुरु पौर्णिमेचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करताना, आई-वडील आणि गुरु यांच्या ऋणात आयुष्यभर राहून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व कर्तव्यभाव जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमास प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, प्रा. अरुण गोरडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या वर्गशिक्षकांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कृष्टरीत्या पार पडले. शेवटी वैशाली काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related posts

अवसरी बुद्रुक येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर; कुत्र्यावर हल्ला !!

Chief Editor

ब्रेम्बो इंडिया आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment