
पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे
भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत- अवसरी बुद्रुक आणि महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र, मंचर यांच्या सहकार्याने अवसरी बु (ता.आंबेगाव) येथे महिलांसाठी फळे व भाज्यांचे निर्जलीकरण प्रक्रिया (Dehydration of fruits and Vegetables Training Program) प्रशिक्षण या विषयावर २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रम शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल. यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिर उद्घाटनप्रसंगी सरपंच सारिका हिंगे,पोलिस पाटील माधुरी जाधव,मा. जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर, मा.उपसरपंच सचिन हिंगे,कोंडीभाऊ शेटे सचिव भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, कल्याण हिंगे ग्रामपंचायत सदस्य ,भगवान हरकळ प्रोजेक्ट मॅनेजर भारतीय उद्योजकता विकास संस्था,पुणे मनिषा जारकड CMRC मॅनेजर,
गौरी सैद उपजीविका सल्लागार,सुप्रभा पिंगळे,योगिता लोखंडे सहयोगिनी, रेहान इनामदार CRP व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जारकरड यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार मा.उपसरपंच सचिन हिंगे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
भारतीय उद्योजकता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नावीन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.



