सामाजिक

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे (पारगाव ) शाळेचे पाच विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र !!

img 20260319 wa0292

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद माॅडेल स्कूल शिंगवे शाळेचे स्वरा महेश झोडगे,सिद्धेश जालिंदर पोंदे,विहान महेंद्र पोखरकर,ऋषिकेश शरद रोडे तसेच रिषभ संजय आहिरे असे सर्वाधिक पाच विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षा २०२६ मध्ये प्रवेश पात्र ठरल्याची माहिती मुख्याध्यापक नवनाथ शिनलकर यांनी दिली.

विविध स्पर्धा परीक्षा,कला,क्रीडा,संगणक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारी जिल्हा परिषद शाळा अशी शाळेची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे.शाळेचे आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती,नवोदय परीक्षेत झळकले आहेत.केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये शाळेचे पाच विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे यापुढील इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण CBSE बोर्डाच्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप,पुणे या ठिकाणी मोफत होणार असल्याची माहिती मार्गदर्शक शिक्षक श्री.जालिंदर पोंदे यांनी दिली.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जालिंदर पोंदे,नवनाथ शिनलकर,अशोक लोखंडे,श्रीकृष्ण डुकरे,सुभाष इंदोरे,विलास भोर,राजेंद्र बोंबे,धनंजय पवार,वैजयंता लोखंडे,संगीता इंदोरे,वर्षा लोंढे,चित्रा पंडित यांनी मार्गदर्शन केले.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र ठरल्याने विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे पंचायत समिती आंबेगावच्या वतीने गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका,विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर,केंद्रप्रमुख राजू जाधव यांनी तसेच भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ,सरपंच सीता पवार,उपसरपंच हिरामण गोरडे,मा.संतोष वाव्हळ,चेअरमन दत्ता गोरडे,पोलीस पाटील गणेश पंडित,अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्ष रेखा पाबळे,वैजनाथ येंधे,रमेश डोके,महेश बांगर,गोरक्षनाथ जगताप,शशी मेहेत्रे,योगेश कासार,समर्थ पंडीत तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

fb img 1773887073740
fb img 1773887062799

Related posts

आजचा प्रत्येक तमाशा फड मालक नाव मोठं, पण जगणं कठीण !!

Chief Editor

अखेर मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला !!

Chief Editor

आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडीचा दहावीचा निकाल ९४%

Chief Editor

Leave a Comment