सामाजिक

शिरदाळे गावची जलवाहिनी म्हणून ओळख असलेल्या गाव तळ्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट !!

1009519906

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील प्रसिद्ध असलेल्या गाव तळ्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.सुरू असलेला कडक उन्हाळा,वातावरणातील बदल यामुळे यावर्षी पाणी पातळी चांगलीच घटली आहे.

गेल्यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर पावसाने सुरवात केली होती.यंदा मात्र पाऊस लांबणीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.शेतकरी देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत असून सुरवातीचा वळवाचा मान्सून पूर्व पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना चांगलं वेग येईल परंतु अजून तरी अशी शक्यता दिसत नाही.

शिरदाळे हे तसे डोंगरावर वसलेले दुष्काळी गाव परंतु फक्त शेतीवर अवलंबून न राहता गावातील अनेक मंडळी बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पाहायला मिळतात.गावच्या स्थानिक मंडळींनी गावचे गावपण टिकवून ठेवले आहे.शिवाय गावची ओळख असलेले गाव तळे हे देखील गावची तहान भागवण्याचे काम शेकडो वर्षे हे तळे करत आहे.

1009519906

१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रथमतः तळ्याचे खोलीकरण करण्यात आहे.त्यानंतर २००७-०८ साली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून पुन्हा खोलीकरण करण्यात आले.त्यामुळे पाणी साठा वाढला असून तेव्हापासून आजपर्यंत हे तळे कधीच आटले नाही.गावातील शेतकऱ्यांची जनावरे पाणी पिण्यासाठी याचा वापर करतात.तर महिला मंडळी कपडे धुण्यासाठी देखील याचा वापर करतात.

तळ्यात सात ते आठ फुटांपर्यंत मासे – या तळ्यात अनेक प्रजातीचे मासे आहेत.त्यामुळे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते.तर काही मासे हे हे सात ते आठ फुटांपर्यंत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी पाहिलेले आहे.

या गावची निर्मितीच या पाणवठ्याच्या आधारावर झाली असावी असा अंदाज जुनी मंडळी सांगतात.हे तळे म्हणजे शिरदाळे गावासाठी एक जीवन वाहिनी असून त्याच्या आधारावर गावात लोकवस्ती टिकून आहे.

fb img 1774661449199

हे गाव तळे म्हणजे आमच्या गावच्या लोकांची जलवाहिनी आहे.या पाण्याच्या वापराचे देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य नियोजन केलेले आहे.त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहचवता येते.शिवाय गेली दहा वर्षांपासून गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी दिले जाते.त्यामुळे याच पाण्याच्या जीवावर आमचे गाव या डोंगरावर टिकून आहे.या तळ्याचे संवर्धन करणे ग्रामस्थांचे देखील कर्तव्य आहे.
श्री.मयुर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे)

Related posts

थोरांदळे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती व एन.एम.एम.एस परीक्षेत उल्लेखनीय यश !!

Chief Editor

“मनातलं गाणं… आता रंगमंचावर!”महानगायक मोहम्मद रफी स्मृतिदिनानिमित्त धामणीत ‘यादे…’ची सुरेल मैफल; ‘या गायक व्हा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव ;जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ !!

Chief Editor

Leave a Comment