सामाजिक

शेवटी खेळ नशिबाचा – अष्टपैलू कलावंत विलासराव गायकवाड देवठाणकर

1009524108

पंचनामा संपादकीय – अष्टपैलू कलावंत विलासराव गायकवाड देवठाणकर ता.अकोले जि.अहिल्यानगर……

अष्टपैलू कलावंत विलासराव गायकवाड देवठाणकर ता.अकोले जि.अहिल्यानगर……त्यांना पाच मुली व एक मुलगा,
असून विलासरावांना, लहानपणापासूनच कलेचे अंग होते. त्यांचे शिक्षण बारावी झाले, आणि शाळा सोडून, स्वतःला कला अवगत करून घेतली.

त्यांचे कुटुंब सर्वसामान्य असून, ते कलाप्रेमी झाले. नंतर ते शेष कन्या, पुणेकर या तमाशाफडाचे संचालक झाले.आई-वडिलांचा कलेला विरोध होता. तरीही,
विलासरावांनी मनाची जिद्द बांधली होती त्यांचे न ऐकता तमाशात प्रवेश केला होता.

सन १९८९ मध्ये, महामंडळाची नोकरी सोडून, कलेसाठी आपले जीवन खर्च करणार असे ठरवले. विलासराव हे रोटो ड्रम सेट, ट्रिपल ,आणि कच्ची वाजवण्यात अत्यंत पटाईत झाले, शिवाय गायन
कला ही परमेश्वराने त्यांना अवगत करून दिली.ते सूत्रसंचालन करून संपूर्ण तमाशा ची देखभाल करीत होते.

शिवाय त्यांनी आईची थोरवी या वगनाट्यातही आपल्या अभिनयाने चांगलीच भूमिका बजावली. त्याबद्दल रसिकांनी त्यांची वाहवा करून शाब्बासकीची थाप मिळवली. त्यांच्या पत्नी शेषकन्या पुणेकर याही गायनात खूप तयार आहेत. विलासरावांची रहाणी,साधी असून ,फड मालकाशी प्रेम कलाकारांची जाणीव, रसिकांची आवड ,हे गुण त्यांच्या अंगी होते.

जिद्द आणि करारीवृती मनात बाळगून सन २००४ साली
स्वतःचा फड उभा करून रसिकांची सेवा करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला. पत्नीची त्यांना भरपूर अशी साथ मिळाली. त्या दोघांनी सुखदुःखाच्या वेळी एकमेकांना आधार देऊन ,रसिकांची सेवा केली.

1009524108

सन २००६ मध्ये लोणावळा येथे, अपघात घडला पण त्या प्रसंगाला, खूप मोठ्या जिद्दीने, तोंड देऊन कलेचा प्रवास हा अखंड चालू ठेवला .त्यांनी आपल्या मुला, मुलींना लोककलेचे ज्ञान प्राप्त करून दिले. आणि त्यांच्या शिक्षणालाही खूप मोठे महत्त्व दिले.

२०११ मध्ये त्यांनी पुण्याला पूर्णविराम देऊन संगमनेर येथे आपले स्थान मांडले. आणि मुलांना उच्चशिक्षित केले.२०२२ मध्ये त्यांचा दुसरा अपघात झाला. त्यावेळी मनात जिद्द बाळगून तमाशाची कला अखंडपणे चालूच ठेवली. पत्नी आणि मुलांनी विलास रावांना भरपूर साथ देऊन मोठे नाव केले आणि महत्त्वाचं म्हणजे लॉक डाऊन च्या काळात कलाकारांची, जबाबदारी घेत त्यांना आधार दिला.

कलाकारावरील प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी यामुळे त्यांचे कलाकारांच्या मनात एक चांगले स्थान निर्माण झाले होते.ते शिस्त प्रेमी आणि व्यसनमुक्त होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी आणि रसिकांसाठी वाहून घेतले होते, त्यांचा तमाशा सुशिक्षित आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला.
शिक्षण आणि संस्कार व कलेचे अंग त्यांच्या फडात दिसून येत होते.

आई-वडिलांच्या विरोधात जाऊन ,स्वतःच्या पायावर शून्यातून जग निर्माण केले होते.विलासराव नेहमी अशा बाळगत की, मी एक स्वतंत्र विश्व निर्माण केले असे म्हणून स्वतः आनंदीत राहत होते.त्यांनी अखंडपणे ३० ते ३५ वर्ष रसिकांची आणि रंगदेवतेची सेवा केली.

आलेल्या संकटांना त्यांनीबाजूला ठेवून रसिकांना आनंदित ठेवले आणि समाज प्रबोधन करून या पारंपारिक लोककलेची सेवा केली. तसेच (पद्मश्री ) कला भूषण
रघुवीर खेडकर आणि विलासराव यांचे जीवापाड मित्रत्वाचे नाते होते. जणू काही भाऊंच्या घरातील एक सदस्यच!!

पत्नी, मुलगा, मुलींनी खूप दवाखाने केले.पण शेवटी मरण हे कोणाला चुकले नाही.त्यांना वयाच्या ५५ व्या वर्षी अर्ध अंग वायू झाला आणि त्यांनी हा जगाचा मायारूपी पिंजरा सोडला….

पण त्यांच्या या महानकार्याचा वारसा चालूच राहील, यात शंका नाही.खरंच या त्यांच्या जीवन प्रवासातून जिद्द, संघर्ष ,संस्कार, कष्ट हे गुण दिसून येतात.तमाशा पंढरीत असा फड मालक होणे अवघड अशा भावना फड मालक व कलावंत व्यक्त करीत आहेत.

त्यांच्या वागण्याची शेवटची पावती म्हणजे तमाशा क्षेत्रात एक मोठी पोकळी अनेक रसिकांनी, कलावंतांनी, फड मालकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली !! त्यांच्या कलेवरील प्रेमाची आठवण कायम स्मरणात राहील यात शंका नाही..

त्यांचा हा जीवन प्रवास, संघर्ष, कला आणि माणुसकी. हा एक आदर्श समाजाला ठेवून जातो. आणि त्यांचा हा वारसा, त्यांची पत्नी आणि मुलं कायम स्वरूपात चालवतील, आणि आपल्या वडिलांचे नाव, तमाशा च्या रंगभूमीवर आणि रसिकांच्या ओठावर कायमच ठेवतील.शेवटी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, अहोरात्र कार्यक्रमाद्वारे, रसिकांची सेवा करून, आपल्या मुलींचे उच्च शिक्षण करून पदव्या प्राप्त केल्या. हे त्यांचे खूप महान कार्य आहे..
हे अगदी नक्की……

त्यांच्या कार्याचा वारसा, त्यांनी कायम ठेवावा खरंच अशा कलावंतांची आठवण झाली म्हणजे आठवते…

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहानी !! त्यांचे नाव अजरामर राहो…..
अशी माते जगदंबेच्या चरणी प्रार्थना …….

लेखक – शाहीर खंदारे (ता.नेवासा)

fb img 1774661449199

Related posts

चिमुकल्यांच्या उत्साही प्रवेशाने गजबजल्या शाळेच्या वर्गखोल्या !!

Chief Editor

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट;मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश

Chief Editor

कु.सुवर्णा बबन आव्हाड – एका चिमुरडीच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी !!

Chief Editor

Leave a Comment