सामाजिक

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

img 20260415 wa0556

पंचनामा प्रतिनिधी -श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्र पारगाव,या ठिकाणी दिनांक ०९/४/२०२६ ते दिनांक १५/०४/२०२६ या सप्ताहात गुरुचरित्र पारायण,गृहपठण श्री सोनमाळ खंडोबा मंदिरात आयोजित करण्यात आले होते

यामध्ये १४५ सेवेकरी पारायणासाठी पहाटे ४ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पारायण करत होते.विजय काका कुलकर्णी यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.यावेळी पारगावचे मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे,स्टोअर किपर अनिल बोंबले,सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,सुधाकर गडाक यामध्ये महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी उपस्थित तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांचे सौजन्य लाभले.

fb img 1774661444136

यामध्ये पारगाव केंद्र प्रतिनिधी महिला सेवेकरी यांची मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.यामध्ये परिसरातील मोठ्या प्रमाणावर महिला सेवेकरी उपस्थित होत्या.शेवटी उपस्थित सर्व महिला सेवेकरी यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली तदनंतर महिला सेवेकरी यांच्या वतीने सगळ्या सेवेकरी यांना महाप्रसादाचे आयोजन केले होते या पुढील काळात अधिकमासनिमित्त सामुदायिक श्रीमद् भगवद्गीता ग्रंथ सेवा आयोजित करण्यात येणार आहे.

Related posts

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर !!

Chief Editor

शिंगवेत (पारगाव ) येथे पोलिओ लसीकरण उत्साहात !!

Chief Editor

श्री भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment