सामाजिक

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन !!

1009820962

पंचनामा प्रतिनिधी -शिंगवे पारगाव समीर गोरडे

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिंगवे इयत्ता पहिलीत दाखल पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा खूप प्रभावी असून यामुळे मुलांना अंगणवाडीतून शाळेत येण्यापूर्वीच शाळेविषयी आवड झालेली पाहायला मिळाली. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेचा विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासाची, चाचणी विविध खेळ व उपक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी सुनील काटे, शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी शैला निमसे,केंद्रप्रमुख राजु जाधव,ग्रामविकास अधिकारी मोरे,पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे, पोलीस पाटील गणेश पंडीत,उपसरपंच हिरामण गोरडे, मा.शिक्षक दिलीप गोरडे तसेच पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते व शाळा पूर्व मेळाव्यास वर्गशिक्षिका वैजयंती लोखंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

1009820971
1009820968
1009820966
1009820964
1009820962

शाळा पूर्वतयारी कार्यक्रमासाठी संगीता इंदोरे,सुभाष इंदोरे, विलास भोर, अशोक लोखंडे, डुकरे सर यांनी काम पाहिले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी केले. शाळा पूर्वतयारीचे नियोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर गोरडे, उपाध्यक्ष रेखा पाबळे, शिक्षण समिती सदस्य महेश बांगर यांनी केले. तसेच पहिली वर्गामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तक, ड्रेस वाटप करण्यात आले तसेच माजी.शालेय व्यवस्थापन समिती सदस्य माऊली पाबळे यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल देण्यात आले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लाडुचे वाटप तसेच मा.शिक्षक दिलीप गोरडे यांच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिस्किटे पुडे वाटप करण्यात आले आभार जालिंदर पोंदे यांनी मानले.

1009790278
1009793449
1009760331

Related posts

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान!!

Chief Editor

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे विज्ञानप्रदर्शन संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment