सामाजिक

समर्थ ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी प्रणव कवडे सीए परीक्षेत यशस्वी; समर्थ संकुलात सत्कार !!

1009930194
 समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेजचा बेल्हेचा माजी विद्यार्थी प्रणव कवडे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही देशातील अत्यंत प्रतिष्ठित व आव्हानात्मक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल समर्थ शैक्षणिक संकुलात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रणव कवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सीए परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण परिश्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश दिला. तसेच शालेय शिक्षणाच्या काळात समर्थ संकुलामध्ये मिळालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेने दिलेली प्रेरणा यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रणव कवडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी प्रणव यांचे यश प्रेरणादायी असून त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यास उपयुक्त ठरेल, असे मत प्राचार्या वैशाली आहेर यांनी व्यक्त केले.

1009930195

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, मुक्ताई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जानकुशेठ डावखर, बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, ग्रामपंचायत सदस्य किरण गुंजाळ, सुनील कवडे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रणव कवडे यांचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता रिठे यांनी केले, तर प्रा. संतोष पोटे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रणव कवडे यांच्या या यशामुळे समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

1009850407

Related posts

आयुष्याचा झोपाळा जितक्या वेगात मागे जातो तितक्याच वेगात तो पुढे पण येतो; फक्त संयम हवा..”

Chief Editor

पंचनामा विशेष – नाते कलेचे त्या रक्ताशी !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

Leave a Comment