सामाजिक

शिरदाळे येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री हनुमान देवाचा भंडारा !!

1010669053

शिरदाळे (ता. आंबेगाव) : ग्रामदैवत श्री हनुमान देवाचा भंडारा उत्सव शिरदाळे येथे भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने उत्सवात सहभाग घेतला.

सकाळी सात वाजता ह. भ. प. तान्हाजी महाराज तांबे यांच्या हस्ते श्री हनुमान देवाची नित्यपूजा करण्यात आली. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत धामणी गावचे भूषण श्री. प्रमोद काका देखणे यांच्या मंत्रोच्चारात श्री हनुमान देवाचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली.

1010668891

सायंकाळी साडेसात वाजता संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुरी, गुळवणी, कांद्याची मिरची व हिरवी मिरची असा पारंपरिक बेत महाप्रसादासाठी ठेवण्यात आला होता. महाप्रसादाच्या तयारीत गावातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोलाचे योगदान दिले, तर महाप्रसाद वाटपाचे नियोजन गावातील तरुण मंडळींनी केले.

उत्सवाची सांगता श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, शिरदाळे यांच्या भक्तिमय भजनाने झाली. या उत्सवाच्या निमित्ताने गावातील एकजूट, धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

दरम्यान, अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र उत्सवाच्या दिवशी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.

1010543616
1010480394
1010663247

Related posts

पंचनामा विशेष – ३ मे आंतरराष्ट्रीय बिबट दिन !!

Chief Editor

शिरदाळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला भेट !!

Chief Editor

गावडेवाडीत ‘पंढरीची वारी’ देखावा ठरतोय आबालवृद्धांचे आकर्षण

Chief Editor

Leave a Comment