
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या पुणे (उत्तर) जिल्हा संपर्क प्रमुखपदी राजेश नागुजी डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
पत्रकारांच्या हक्कांसाठी तसेच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उपक्रमांना बळकटी देण्यासाठी डाके यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. संघटनेचे ध्येय व धोरणे लक्षात घेऊन कार्यक्षेत्रात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राजेश डोके यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून पुणे (उत्तर) परिसरातील पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







