सामाजिक

काठापूर बुद्रुकमध्ये बिबट्या मादी जेरबंद !!

1010670733

पंचनामा प्रतिनिधी – काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गणेशनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या बिबट्याच्या मादीला वनविभागाने शनिवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे काठापूर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

काठापूर बुद्रुक येथील पांडुरंगवस्ती, भोकरवाडी तसेच गणेशनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर नागरिकांना दिसून येत होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

गणेशनगर येथील नारायण लहू जाधव यांच्या घरासमोर वनविभागाने पिंजरा लावला होता. शनिवारी पहाटे बिबट्याची मादी या पिंजऱ्यात जेरबंद झाली. अंदाजे साडेतीन वर्षे वयाची ही मादी असून, तिला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, नीलम चव्हाण, पूजा कांबळे तसेच कर्मचारी अशोक जाधव यांनी प्रयत्न केले.

1010663234
1010631744
1010457105

Related posts

नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगलताई !!

Chief Editor

जागतिक आदिवासी दिन जांभोरी येथे उत्साहात साजरा !!

Chief Editor

लोणी (धामणी ) गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड !!

Chief Editor

Leave a Comment