सामाजिक

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

img 20260403 wa0245
img 20260403 wa0245

पंचनामा प्रतिनिधी – १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय मोटार सायकल चालवायची नाही. आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लायसन काढल्या शिवाय व हेल्मेट डोक्यात घातल्या शिवाय मोटार सायकल चालवायची नाही असे प्रतिपाद सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले.

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक सहायक पोलिस निरीक्षक सतिश कांडगे मार्गदर्शन करताना बोलत होते.

अल्पवयीन मुलांनी गाडी वापरणे गुन्हा असून, निदर्शनास आल्यास पालकांवर सक्तीने कारवाई करण्यात येईल. मोबाईल येणाऱ्या लिंक डाऊनलोड करु नये.मोबाईल वरून ओटीपी शेअर करू नये.तसेच वाढत्या चोऱ्या बाबत सुरक्षितता बाळगण्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता व सायबर सुरक्षतेची शपथ देण्यात आली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेतील विविध उपक्रम, शाळा सुरक्षा विषयक माहिती प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली.

कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील विठ्ठल वळसे पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मोहन दरेकर यांनी तर आभार विनोद बारवकर यांनी मानले.

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयात रस्ता व सायबर सुरक्षा विषयक शपथ देताना पोलिस अधिकारी.

fb img 1771121541695

Related posts

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिराच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त भाविकांनी घेतला मासवडी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद !!

Chief Editor

लोणी (धामणी ) येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त शर्यतीमध्ये धावले ३५० बैलगाडे !!

Chief Editor

सावित्रीबाई फुले यांचे चरित्र समाजासाठी दिशादर्शक – स्नेहलताई शेळके समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment