सामाजिक

आदर्शगाव गावडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात मासवडीचे जेवण;तीन हजार भाकरींचे नियोजन ;महिलांसाठी वीस पैठणींचा लकि ड्राॅ !!

img 20260403 wa0247
img 20260403 wa0253

पंचनामा प्रतिनिधी – आदर्श गाव गावडेवाडी येथे रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान चालू असलेल्या किर्तन सोहळ्याचे अत्यंत उत्कृष्ठ नियोजन ग्रामस्थ,तरूण वर्ग,महिला भगिनी यांच्या माध्यमातून केले असून,पुणे,मुंबई सह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

एक हजार महिलांनी प्रत्येकी तीन,या प्रमाणे घरून भाकरी आणल्या तर उत्साही महिलांनी एकत्र येऊन मासवडी आणि झणझणीत रस्सा बनवला.नागरिकांनी भाकरी चुरुन जेवणाचा मनसोक्त आनंद लुटला.

गावकारभार्यांनी भाकरी आणनार्या महिलांसाठी वीस पैठणींचे लकि ड्राॅ पद्धतीने वाटप केले असून,महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.लकि ड्राॅ मध्ये दररोज एक पाण्याचा जार आणि पेरुची हुंडी दिली जाते.पाणी,पुष्पहार असे अनेक प्रकारचे सौजन्य दिले जाते.

शुक्रवार दि.3/4/2026 सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.यावर्षी उत्तर पुणे जिल्ह्यातील हभप महाराजांची किर्तनरुपी सेवा संपन्न झाली.

img 20260403 wa0247

इवलेसे रोप लावियेले द्वारी |
तयाचा वेलू गेला गगनावरी ||

अखंड हरिनाम सप्ताहाचे 61वे वर्ष त्याकाळातील वारकरी सांप्रदायातील बुजूर्ग मंडळींनी सप्ताह सुरू केला.आज मात्र दानशूर व्यक्तींच्या सहभागातून पंचपक्वानांच्या पंगती आणि हजारो भाविक भक्त किर्तन श्रवण करण्यासाठी येऊ लागले.

fb img 1773887073740

Related posts

मिडगुलवाडी गावाला जिल्हा परिषदेकडून घंटागाडी !!

Chief Editor

अभिषेक कामठे चे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक !!

Chief Editor

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

Leave a Comment