सामाजिक

असे तमाशाफड ; असे तमाशा व्यवस्थापक – मा.बाळासाहेब विरळीकर

img 20260403 wa0199

पंचनामा विशेष – एक कलाप्रिय व्यक्ती म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते असे तमाशा पंढरी काळज येथील अतिशय अनुभवी व धुरंधर मॅनेजर म्हणून मा. बाळासाहेब विरळीकर यांचा उल्लेख करावा लागेल.

अनेक वर्ष तमाशा कोणाचे त्यांनी मॅनेजमेंट संभाळले असल्यामुळे आज पिंपरीकर तमाशाफडाची धुरा सांभाळीत आहेत. इतर फडांना ते सहकार्य करतात. तमाशा पंढरी काळज हे आपलं कुटुंब आहे असे ते म्हणतात.

ज्ञानसंपन्नता आणि अनुभव संपन्नता , विश्वास याचा योग्य उपयोग तमाशाफडाचे मॅनेजर म्हणून विरळीकर करतात. तमाशाच्या धंद्यासाठी वाहून जाणे, यापेक्षा धंद्यातून निश्चित ध्येयापर्यंत जाणे हा महामंत्र आहे त्यांचा.
एक सुस्वाभावी ,शांत, परहितदक्ष व्यक्ती म्हणून मा. बाळासाहेब विरळीकर यांचा नावलौकिक आहे

विरळीकर यांच्या जगण्यात शिस्त, बोलण्यात शिस्त असल्यामुळे स्वभावात स्पष्टवक्तेपणा ,कोणाला न दुखावणे आणि एकच लक्ष फक्त तमाशाफडाला जास्तीत जास्त सुपाऱ्या कशा मिळतील यावर लक्ष.
जरी ते तमाशा पंढरी काळज येथे बसत असले ,तरी त्यांचे रात्रंदिवस सर्व लक्ष तमाशाफडाचा कार्यक्रम कसा चालला आहे, गाड्या वेळेवर गावात पोचल्या का? यावर असतं.

स्वतःच भागल म्हणजे सर्व काही मिळालं अशी प्रवृत्ती विरळीकर यांची नसल्याने, आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते वैचारिक व आर्थिक मदत व सहकार्य करतात.मानसिक पाठबळ देतात. त्यामुळे त्यांचे चाहते बरेच निर्माण झालेले आहेत.

येणाऱ्या यात्रा कमिटीला अतिशय छान समजून सांगतात, यात्रा कमिटीशी ते खरं बोलतात.यामुळे त्यांच्या शब्दाला वजन आलेले आहे.

माझं ते माझं आणि दुसऱ्याच तेही माझंच अशी स्वार्थीभावना न ठेवता
माझं ते तुमचं आणि जे तुमचं तेही तुमचंच अशी संस्कृती जपतात. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभलेले आहे.

एक निर्मळ व्यक्तिमत्व असल्याकारणाने कुटुंबात सुखाचा चंद्र प्रकाश पडलेला आहे.
एक आदर्श मॅनेजर म्हणून त्यांच्याभोवती वलय निर्माण झालेले आहे.सदैव आरोग्यवान, आयुष्यमान व्हावे

     राजेंद्र .डी .मोरे बारामती
fb img 1773887068819

Related posts

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा !!

Chief Editor

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार; विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखानास्थळी संपन्न झाला वन-अग्नीमुक्त दिन!!

Chief Editor

Leave a Comment