सामाजिक

निवेदन क्षेत्रातील कोहिनूर श्री. मयूर संभाजी सरडे

1009510925

पंचनामा संपादकीय – नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व या अशा गोष्टी आहेत ज्या आपणाला उपजत मिळत नाहीत तर त्या आपल्या कार्याने मिळवायच्या असतात.आमचे परममित्र मयूर संभाजी सरडे हे याचे उत्तम उदाहरण !!

तीन वर्षांपूर्वी निवेदन क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.गावात,तालुक्यात राजकारण,समाजकारणाची असलेली आवड तसेच क्रिकेट क्षेत्रामुळे मिळालेली ओळख या सर्व गोष्टींचा आधार घेऊन काहीतरी करायला हवे या उद्देशाने आपल्याला असलेली आवड पुढे व्यावसायिक स्वरूपात चालू करण्याचा निर्णय घेतला.समाजात असणारी गरज ओळखून सर्व सामान्य माणसांना देखील आपल्या कलेचा उपयोग आणि सर्वांना अगदी परवडेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

1009510925

पहिल्याच वर्षी काम सुरू करताना थोडी भीती होती.त्यात सुरवात केल्यानंतर अनेक निवेदकांनी संपर्क करून स्वागत केले.अनेकांचे मार्गदर्शन आजही मिळत आहे.मग त्या मध्ये आंबेगाव तालुक्यातील जेष्ठ निवेदक सुरेश वाळुंज,अमित कातळे,संदीप वाबळे,अलंकार बाणखेले,सिद्धेश पिंगळे,रामभाऊ वाळुंज,अतुल बनकर,तन्मय चिखले, आदेश टोपे,संदीप देशमुख,अमोल डावरे,बाळासाहेब पिंगळे,अजित कदम,जगन लंके यांचे तर निवेदन क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदिका पूजाताई थिगळे,तनुजा पोखरकर,दीपाली कुरकुटे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आज पर्यंत मिळाले आहे.म्हणूनच हा प्रवास यशस्वी सुरू आहे.

यंदा लग्न समारंभाचा तिसरा सिजन यशस्वीपणे संपन्न केला.गेल्या तीन वर्षांमध्ये लग्न सोहळे,अनेक मोठ्या राजकीय सभा,होम मिनिस्टर,डोहाळे जेवण,वाढदिवस असे शेकडो कार्यक्रम संपन्न करण्याचे भाग्य मिळाले आहे.हे शक्य झाले केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने.लग्न सिजन जरी कमी झाला असला तरी इतर कार्यक्रम हे वर्षभर सुरूच असतात.परंतु आज सलग तीन वर्षे तुम्ही जो मला पाठिंबा आशीर्वाद आणि सहकार्य करत आहात त्यातून उतराई म्हणून छोटासा प्रयत्न आहे.आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार आणि धन्यवाद असेल.

fb img 1774661449199

अशीच साथ आणि सोबत कायम असुद्यात…
धन्यवाद:- निवेदक श्री.मयुर सरडे
७८७५५८९८७७/८८८८५८२७२३

संपादक -श्री. संतोष बापू पाचपुते
८८८८५०९७००/८८८८५०९७०३

Related posts

समर्थ शैक्षणिक संकुलात ‘डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

Chief Editor

भावना महत्वाची,भावना जपणे पण तितकंच महत्वाचं !

Chief Editor

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे वृक्षारोपण संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment