
पंचनामा विशेष – आयुष्यातील प्रवासात आज प्रत्येकजण स्वार्थाच्या मोहात आणि दिखाऊपणात रममाण झालेला दिसतोय..आज आपण पाहतो की माणूस गेल्यानंतर “Rest in peace” लिहून भावनिक होणारी लाखो माणसं आज बघायला मिळतात..पण माणूस जिवंत असताना “Take Some Rest” असं म्हणायला एक व्यक्ती सुध्दा सोबत नसते.. जेंव्हा या जगातून निरोप घ्यायची वेळ येते..तेंव्हा हजारो माणसं आपल्या सोबत असतात..पण आपण ज्यावेळेस आयुष्याशी संघर्ष करत असतो त्यावेळेस आपली साधी विचारपूस देखील करणारं कोणीच नसतं..! माणसाला संघर्षाच्या काळात फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते..चार प्रेमाचे शब्द माणसाला फार मोठा आधार देऊन जातात..! पण आयुष्य जगत असताना हा आधार मिळणं प्रत्येकाच्याच नशिबात असतं असं नक्कीच नाही..!म्हणूनच आयुष्यातील प्रवासात कोणी आपल्या सोबत असेल किंवा नसेल आयुष्यात कीतीही प्रॉब्लेम असले तरिही आपली साथ आपण कधीच सोडायची नसते आणि निराश व्हायचं नसतं..या प्रवासात शेवटी “आपलं असणं” आणि “आपलं हसणं” हे आपल्यालाच जपावं लागतं.. आणि ते जपलचं पाहिजे..!!
“दुधाने” भरलेल्या मातीच्या भांड्याचा दर्जा “विषा” ने भरलेल्या सुवर्णजडीत भांड्याच्या दर्जा पेक्षा कितीतरी पटीने उच्च असतो.. त्याप्रमाणे माणसाच्या बाह्य सुंदरतेपेक्षा त्याच्या आतील संस्कारच मुल्य कितीतरी पटीने जास्त आहे..जीवनातील या प्रवासात तुमची “स्तुती” करणारे तुम्हाला नक्कीच ओळखत असणार..परंतू तुमची “काळजी” करणाऱ्याना मात्र तुम्हालाच ओळखावे लागेल..
जीवन प्रवासात रक्तगट कोणताही असला तरी चालेल.. रक्तात माणूसकी आणि ह्रदयात प्रेम असायलाच हवं..एखाद्या अनमोल झाडाच्या पानासारखेच गळून कचरा बनू नका तर मेहंदीच्या पानासारखे रंगीबेरंगी नक्कीच बना..जे स्वतःला कुस्करून दुसर्याच्या आयुष्यात रंग भरतात..म्हणूनच आयुष्यात “मोह नसावा पैशाचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा अन् गर्व नसावा सौंदर्याचा”..कारण या सर्व नष्ट पावणाऱ्या गोष्टी आहेत…
हसल्याने आणि हसऱ्या चेहऱ्याने आयुष्य वाढते.आणि दुसर्यांना हसवल्याने आयुष्याच महत्व वाढतं..! म्हणूनच हसत हसत जगत रहावं..आयुष्य हे जास्तच सुंदर व मनमोहक वाटतं..! आपण आयुष्याचे Calculation खूप केलं..पण सुख दुःखाचे Accounts कधी जमलेच नाहीत..जेंव्हा टोटल झाली तेंव्हाच समजले की “आठवण” सोडून इथे काहीच Balance उरत नाही…!!
निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर
छत्रपती संभाजीनग
मो. नं. – 9881084320


