सामाजिक

आई वडिलांची,देशाची सेवा करा; तरुणांनी व्यसनापासून दूर रहा – ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

img 20260124 wa0129
img 20260124 wa0129

पंचनामा मंचर प्रतिनिधी – कर्म कुणाला चुकत नाही. त्यामुळे जीवन जगत असताना चांगले काम करा. आई-वडिलांची सेवा करत असताना देशसेवा सुद्धा झाली पाहिजे. व्यसनापासून दूर राहा असे आवाहन समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थानात गणेश जयंती उत्सवानिमित्त देव जन्माच्या कीर्तनात देशमुख महाराज बोलत होते.

देशमुख महाराज पुढे म्हणाले पुणे जिल्हा ही पुण्यभूमी आहे. त्यातही श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग हे गाव अर्धपीठ गणपती मुळे राज्यात प्रसिद्ध झाले आहे. या भूमीत आपला जन्म झाला ही भाग्याची गोष्ट आहे असे सांगून देशमुख महाराज म्हणाले जीवन जगत असताना चांगले कर्म करा. आचार विचार शुद्ध असल्यास हातून चांगले काम घडेल. आई-वडिलांची तसेच देशाची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. जीवनात सकारात्मक रहा. व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन देशमुख महाराज यांनी केले.

दरम्यान अर्धपीठ गणपती देवस्थानात गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे महापूजा त्यानंतर अभिषेक, आरती झाली. सकाळी हारतुरे मांडव डहाळ्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांची मने जिंकून घेतले. वाद्यवृंद सहभागी झाला होता. देव जन्माचे किर्तन झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला.

सायंकाळी श्रींच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बाल वारकरी सहभागी झाले होते. अर्धपीठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार दर्शनासाठी आले होते. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्था पाहिली.

img 20260124 wa0129

श्री गणेश जयंती निमित्त श्री क्षेत्र वडगाव येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले.

Related posts

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

Chief Editor

धामणी (लोणी) पहाददरा परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांना शेती उपसा सिंचन योजनेसाठी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी करणार आमरण उपोषण !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने साजरी झाली वटपौर्णिमा !!

Chief Editor

Leave a Comment