सामाजिक

धामणी (लोणी) येथे संपन्न झाले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर !!

img 20260125 wa0450

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय, दत्तात्रयनगर-पारगाव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन विशेष श्रमसंस्कार शिबीर शुक्रवार (दि.१६) ते गुरुवार (दि.२२) या कालावधीत धामणी या ठिकाणी पार पडले. या शिबिराचा समारोप गुरुवार (दि.२२) रोजी करण्यात आला.उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला.काही स्वयंसेवक व स्वयंसेवकांनी आपल्या भाषणातून आपली मनोगते व्यक्त केली.

समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे म्हणाले स्वतःसाठी जीवन न जगता दुसऱ्यासाठी जीवन जगणे आवश्यक विद्यार्थी सात दिवसाच्या शिबिरामुळे स्वावलंबी बनतात आणि संस्कार घडण्याचे योग्य काळ हा राष्ट्रीय सेवा योजना हाच असतो विवेकानंदांच्या कल्पनेनुसार भविष्याच्या दृष्टिकोनातून युवक हे देशाची प्रगती करणारे असतात म्हणून राष्ट्राची जडणघडण चांगल्या प्रकारे घडवतात.

शिबिर काळात धामणी या गावची ग्रामस्वच्छता करण्यात आली तसेच धामणी गावातील खंडोबा मंदिर,मुक्ताई माता मंदिर व हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि गावातील बाजारपेठ, स्मशानभूमी असे सर्व परिसर स्वच्छ करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,श्री शिवाजी विद्यालय या ठिकाणी देखील स्वच्छता करण्यात आली.तसेच ग्राम सर्वेक्षण करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.आरोग्य शिबिर,घनकचरा व्यवस्थापन रॅली व पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

शिबिराच्या सहाव्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यासाठी देखील ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्याचबरोबर विविध प्रकारची व्याख्याने आयोजित करून स्वयंसेवकांचे प्रबोधन करण्यात आले.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात रोहित नाणेकर व ऋतुजा जाधव यांची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या संचालिका पुष्पलता जाधव तसेच, पंचायत समितीचे मा.सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच अक्षय विधाटे, माजी सरपंच सागर जाधव,अंकुश भूमकर,शशिकांत थोरात,महेश कदम,बाळासाहेब बढेकर, सुहास रोड, संचालक मच्छिंद्र गावडे, संस्थेचे कार्यालयीन सचिव,वसंत जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे,प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ओंकार ढोबळे आणि प्रा.सपना औटी यांनी उत्तम रीत्या पार पाडले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे सूत्रसंचालन प्रा.राहुल डोळस आणि आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सपना औटी यांनी मानले.

img 20260125 wa0450

धामणी (ता.आंबेगाव ) येथे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाने बांधलेला बंधारा

Related posts

सूर्य शक्ती प्रकल्पांतर्गत शेतीस उपयुक्त सौर व तांत्रिक साहित्याचे लाभार्थ्यांना वितरण !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळेचा आदर्श उपक्रम; गावात केली प्लास्टिक बंदी !!

Chief Editor

अजामेळा दिंडीच्या वतीने पंढरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव !!

Chief Editor

Leave a Comment