सामाजिक

धामणी (लोणी) येथे रविवार दि.१ फेब्रुवारी व सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवाचा यात्रोत्सव!!

img 20260125 wa0534
img 20260125 wa0410

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या धामणी (लोणी) येथे माघ शुद्ध १५ (पौर्णिमा ) शके १९३७ रविवार दि.१ फेब्रुवारी व सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवाचा यात्रोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ ते दहा देवास हारतुरे, सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत बैलांची व बगाडांची भव्य मिरवणूक, दुपारी तीन ते सहा देवास नवसाचे बगाड दाखवणे,रात्री आठ ते दहा ढोल ताशाच्या पथकासह पालखी व छबिना मिरवणूक नंतर सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने नवसाच्या बैलगाड्यांच्या भव्य शर्यती संपन्न होणार आहेत.तसेच पहिल्या दिवशी रात्री दहाच्या नंतर सौ.छायाताई खिलारे बारामतीकर सह दीपक कुमार बारामतीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत तुरेवाले शाहीर रामदास गुंड आणि पार्टी विरुद्ध कलगीवाले शाहीर नाना साळुंखे आणि पार्टी यांच्या कलगीतुऱ्याचा सामना रंगणार आहे. दुपारी तीन ते सहा या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा देखील संपन्न होणार आहे.रात्री दहाच्या नंतर साहेबराव नांदवळकर यांच्या आश्रयाखाली वसंतराव नांदवळकर सह रविंद्र पिंपळकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

येणाऱ्या भाविकांसाठी स्थानिक प्रशासन,ग्रामस्थांच्या वतीने व देवस्थानच्या वतीने सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पंचक्रोशीतील भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन धामणी, शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

img 20260125 wa0410

Related posts

वाळुंजनगर येथे बिबटयाचा वावर वाढला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment