सामाजिक

पंचनामा विशेष – जागतिक कोल्हा दिन !!

f3819c7aa0b44c4db78312276baffbd4
f3819c7aa0b44c4db78312276baffbd4

कोल्हा हा आपल्या परिसरातील आढळणारा एक महत्त्वाचा लहान शिकारी प्राणी असून इंग्रजीमध्ये त्याला Mesocarnivore असे म्हटले जाते. कोल्हे प्रामुख्याने माळरान, गवताळ प्रदेश तसेच शेती भागात राहणे पसंत करतात. आपल्या भागातील दाट ऊस शेतीतही कोल्ह्यांचे वास्तव्य आढळते.

कोल्हा हा परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक असून उंदीर, कीटक आणि इतर लहान जीवांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आजकाल शिकार करण्यापेक्षा कोल्हे अनेकदा पोल्ट्रीतील टाकून दिलेल्या कोंबड्या, उघड्यावर फेकलेले जनावरांचे अवशेष, तसेच ताजी फळे खाऊन आपली भूक भागवताना दिसतात. काही वेळा ऊस खातानाही त्यांचे निरीक्षण झाले आहे.

fb img 1774661444136

कोल्हे समूहाने राहतात. प्रजनन काळात मादी कोल्ही मऊ मातीत खोल बिळे (खड्डे) तयार करून पिल्लांचे संगोपन करते. अनेक वेळा पाईपमध्येही कोल्ह्यांची पिल्ले आढळल्याचे निरीक्षणात आले आहे. मादी कोल्ही एकावेळी साधारण ५ ते ७ पिल्लांना जन्म देते.

मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे आणि अन्नसाखळीत होणारे बदल यामुळे कोल्ह्यांवर अनेक संकटे आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या वन्यजीवाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतने राबविला आहे अनोखा उपक्रम!!

Chief Editor

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

मधमाशीची दृष्टी ठेवा,फुलांची काहीच कमी नाही – मधमाशींच्या पोळयांसाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही !!

Chief Editor

Leave a Comment