सामाजिक

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

img 20260419 wa0526
img 20260419 wa0526

पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन व मिल रोलरचे पूजन रविवार (ता. १९) अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या शुभहस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर प्रतापसिंह सावंत, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सिव्हील इंजीनिअर अमीर पठाण, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे व कामगार आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरु केले आहेत.

fb img 1774661444136

ऊस तोडणी यंत्राचे करार करणेसाठी इच्छुक असणा-या मशीन मालकांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच येणारा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

img 20260419 wa0526

दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बु.ता.आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Related posts

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक शाळेला मिळाले टाटा मोटर्स (बिकन) या संस्थेतर्फे ग्रीन स्कूल अवार्ड २०२५ चे पारितोषिक !!

Chief Editor

शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे : प्रा.मोबीन तांबोळी

Chief Editor

Leave a Comment