सामाजिक

संत निरंकारी मिशनच्या वतीने करुणा, प्रेम व सह-अस्तित्वाचा संदेश; जुन्नरमध्ये ८० जणांचे रक्तदान

1010758733
1010758732

पंचनामा जुन्नर, ता. ३० : संत निरंकारी मिशनच्या वतीने करुणा, प्रेम, सह-अस्तित्व आणि मानवसेवेचा संदेश देत रविवारी (ता. ३०) जुन्नर येथील संत निरंकारी सत्संग भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ८० युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले.

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेने परोपकार व मानवसेवेच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले.

शिबिराचे उद्घाटन जुन्नर नगरपरिषदेच्या सौ. सुजाताताई काजळे व पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे यांच्या हस्ते झाले. यावेळी आळेफाटा संयोजकीय क्षेत्राचे संयोजक चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मिशनची रक्तदान सेवा गेल्या चार दशकांहून अधिक काळ सुरू असून, देशभरातील विविध रक्तदान शिबिरांमधून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा व सद्भावनेचा मार्ग दाखविला, तर बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत रक्तदान चळवळीला व्यापक स्वरूप दिले. ही मानवसेवेची परंपरा सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

1010758732

कार्यक्रमाच्या शेवटी रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी, मान्यवर व आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे लक्षण डाके (सर) यांनी आभार मानले.

1010756749
1010755876
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

यशाच्या शिखरावर समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स; विद्यापीठ परीक्षेत विद्यार्थ्यांची दैदिप्यमान भरारी !!

Chief Editor

श्रीराम मंदिर द्वारकाधीश आश्रमात ११ फुटी भव्य ध्यानस्थ महादेव मूर्तीचा अनावरण व दर्शन सोहळा !!

Chief Editor

मोरडे फूड्स प्रा. लि.कंपनी मध्ये समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment