
पंचनामा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर – आप्पावाडी येथील श्री राम मंदिर द्वारकाधीश आश्रमात धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची सातत्याने मालिका सुरू असून, आता आश्रम परिसरात ५१ फुटी श्रीरामरायाची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
आश्रम परिसरात छत्रपती संभाजीनगरमधील सर्वांत उंच असलेली ११ फुटी ध्यानस्थ महादेवाची मूर्ती नुकतीच विराजमान करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील भव्य धार्मिक उपक्रम म्हणून ५१ फुटी श्रीरामरायाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. या पवित्र कार्यासाठी भाविक, रामभक्त आणि समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्याला हातभार लावण्यासाठी आश्रमात गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री सुरू करण्यात आली आहे. या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर काही वेळात विरघळतात. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळत असून, या उपक्रमातून प्राप्त होणारा निधी ५१ फुटी श्रीरामरायाच्या मूर्तीच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ३ इंच, ९ इंच आणि ११ इंच अशा विविध आकारांत उपलब्ध आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन रामकार्याला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मूर्ती बुकिंगची अंतिम तारीख ५ सप्टेंबर असून, बुकिंग व अधिक माहितीसाठी ९१५५२२१००८, ९३०७४१९०५९ व ७६२०६०९०७० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
“आपली छोटीशी मदत… रामकार्याची मोठी सुरुवात!” या भावनेतून सर्व रामभक्तांनी या पवित्र कार्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री राम मंदिर द्वारकाधीश आश्रम, आप्पावाडी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
॥ जय श्रीराम ॥







