सामाजिक

श्री राम मंदिर द्वारकाधीश आश्रमात सामुदायिक हनुमान चालीसा पठण उत्साहात !!

1010760430

पंचनामा प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर – श्री राम मंदिर द्वारकाधीश आश्रम, आप्पावाडी, शरणापूर फाटा, छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार (दि. २९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सामुदायिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

हिंदू धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास भाविक, ग्रामस्थ व धर्मप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी एकत्रितपणे हनुमान चालीसा पठण करून श्री हनुमंताचे स्मरण केले. यावेळी संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

या सामुदायिक उपक्रमातून धर्म, संस्कृती, एकता आणि समाजातील बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला. धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास श्री राम मंदिर द्वारकाधीश आश्रम, आप्पावाडीचे पीठाधीश श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी डॉ. विशालानंद सरस्वती महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. जीवन राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच रणजितसिंग बेडवाल, राजू महेर, हरिनारायण पाचोरी, कृष्णा बेडवाल, गजानन पांढरे, लक्ष्मण आप्पा लिंबारे, राम आप्पा लिंबारे, ईश्वर आप्पा लिंबारे, सचिन आप्पा लिंबारे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सामुदायिक हनुमान चालीसा पठणामुळे उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ झाली. भविष्यातही धर्म, संस्कृती, सेवा आणि सामाजिक एकतेला बळ देणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

1010756749
1010755851
1010690614
1010760540

Related posts

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

राष्ट्रीय क्विझ स्पर्धेत “समर्थ फार्मसी” च्या रुचा कोरडेचे नेत्रदीपक यश२०० विद्यार्थ्यांवर मात करत पटकावले विजेतेपद; २५ पैकी २५ गुणांची कमाई, अवघ्या ४ मिनिटे १५ सेकंदांत प्रश्नमंजुषा पूर्ण !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे बालचमूचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment