सामाजिक

श्रावणी सोमवारनिमित्त जारकरवाडीत फराळ वाटपाचे आयोजन !!

1010763328

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने श्रावणी सोमवार उत्सव २०२६ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांसाठी फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले.

1010763328

श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष धार्मिक महत्त्व असून, या काळात भगवान शंकराच्या दर्शनासाठी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत असून, श्रावणी सोमवार उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

1010760540
1010756749
1010755876

Related posts

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !!

Chief Editor

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील कापडदरा वस्तीवरील रस्ता वहिवाटीचा वाद २५ वर्षांनंतर मिटला!!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरदाळे यांना सेवा निवृत्त शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री.दादाभाऊ झुंबरराव शेलार यांच्याकडून धनादेश सुपुर्द !!

Chief Editor

Leave a Comment