सामाजिक

औद्योगिक कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार; समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न !!

1010500197

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागाच्या वतीने ‘औद्योगिक स्वयंचलितीकरण व एम्बेडेड प्रणाली’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये प्रोलिफिक सिस्टिम अँड टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पुणेचे प्रादेशिक व्यवस्थापक विवेक विष्णू सरदळ यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टिम्स, आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, उद्योगक्षेत्रातील सध्याचे प्रवाह आणि त्यांचे प्रत्यक्ष उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी, उद्योगाच्या बदलत्या गरजा आणि विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाच्या तांत्रिक कौशल्यांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी समर्थ E&TC विभाग आणि प्रोलिफिक सिस्टिम अँड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होणार असून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभव, तांत्रिक कौशल्यविकास, प्रकल्पाधारित शिक्षण तसेच रोजगार व करिअरच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

1010500218

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता उद्योगाच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडणे, त्यांच्यामध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सेमिनार आणि MoUच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी नवी दिशा मिळाली.

या उपक्रमाबद्दल समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके तसेच कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. डिपार्टमेंट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दिपाली गडगे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रा. सुचिता साबळे यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यातील रोजगारक्षम अभियंते घडविण्यासाठी या सहकार्याचा मोठा फायदा होणार आहे.

1010457105
1010480394
1010498718

Related posts

लोणी वाफगाव घाटात अती पावसाने झाडे आणि मातीचा मलबा कोसळला !!

Chief Editor

‘इंडस्ट्री 4.0’च्या युगात विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी; समर्थ कॉलेजमध्ये औद्योगिक ऑटोमेशनवर मार्गदर्शन

Chief Editor

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन !!

Chief Editor

Leave a Comment