
गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; भूगोल फाउंडेशनच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंचनामा प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, दि. २६ (प्रतिनिधी) – पर्यावरणाचे रक्षण आणि उत्सवाचा आनंद दोन्ही एकत्र साधता येतात, हा संदेश देत भूगोल फाउंडेशन महाराष्ट्र (भारत भुमाता वसुंधरा – निसर्ग जपुया, पर्यावरण राखुया) या सामाजिक संस्थेने शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन जनजागृती अभियानाला नागरिक, गणेश मंडळे आणि प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले होते. पहिला टप्पा दुपारी १ ते ५ या वेळेत इंद्रायणी नदीच्या मोशी येथील घाटावर पार पडला. यावेळी फाउंडेशनचे स्वयंसेवक हातात “स्वच्छ नदी स्वच्छ तलाव”,शाडु किंवा मातीचीच मुर्ती घ्या, “पर्यावरणपूरक गणेश विसर्जन”, “एक झाड लावा पर्यावरण वाचवा”, “जल सुरक्षित तो कल सुरक्षित” जल,नदी प्रदुषण थांबवा,गणपती बाप्पा मोरया पर्यावरणाचे रक्षण करुया असे फलक घेऊन उभे होते.
विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीला थांबवून त्यांना नदीत हार, फुले, प्लास्टिकच्या पिशव्या न टाकण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले. पालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले व निर्माल्य जमा करुन कलशातून ठेवत होते. या वेळेत सुमारे १००० हून अधिक मूर्तींचे विसर्जनासाठी जमा करण्यात आल्या त्यापैकी अनेक मोठ्या सार्वजनिक मंडळांनी,नागरिकांनी जागेवरच निर्माल्य दान करण्यास सहमती दर्शवली.
त्यानंतर दुसरा टप्पा सायंकाळी ६ नंतर संतनगर मोशी-प्राधिकरण सेक्टर-६ येथील कृत्रिम विसर्जन हौदाजवळ घेण्यात आला. सायंकाळनंतर नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. येथे सतत घोषणा दिल्या जात होत्या. शाडू किंवा मातीच्या मूर्ती वापरण्याचे, थर्माकोल आणि प्लास्टिकची सजावट टाळून नैसर्गिक साहित्य वापरण्याचे,प्लॅस्टिक न वापरण्याचे,झाडे लावा झाडे जगवा,गणपती बाप्पा मोरया पर्यावरणाचे रक्षण करुयात,नदीत हार,फुले,प्लास्टिक पिशव्या टाकु नका,पालिकेने ठेवलेल्या कलशातच निर्माल्या दान करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी लहान मुलांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी माहिती सांगण्यात आली.अनेक नागरिकांनी “आम्ही पुढच्या वर्षीपासुन शाडुचीच मुर्ती घेऊ” असा संकल्प केला.पोलीस, पालिकेच्या प्रशासन कर्मचा-यांनी , अनेक नागरिकांनी भूगोल फाउंडेशनच्या कामाचे कै्ातुक व सहकार्य केले.

या उपक्रमाचा थेट परिणाम दिसून आला. दोन्ही ठिकाणी नदीपात्रात आणि हौदाच्या आजूबाजूला कचरा आणि प्लास्टिकचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी राहिले. उपस्थिती हाच पर्यावरण वाचवण्यासाठी मदतीचा हात ठरला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज म्हणाले “गणेशभक्ति आणि पर्यावरण भक्ति एकत्रच असली पाहिजे.जल सुरक्षित तो कल सुरक्षित हा संदेश घेऊन दरवर्षी हा उपक्रम राबवतो.तरी नागरिकांनी पर्यावरणासाठी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.तसेच पुढे ते म्हणाले यंदा मिळालेला प्रतिसाद हा हरित भविष्याची नांदी आहे.”चला पर्यावरणाच्या रक्षणासाठी भूगोल फाउंडेशन बरोबर एकत्र येऊया हा मुळ संदेश या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरला.

या अभियानात भूगोल फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष विठ्ठलनाना झुंबरशेठ वाळुंज, अजय म्हस्के,हभप गुलचंद लोखंडे ,राजेश किबिले,पार्थ दरंदळे असे अनेक सहकारी तसेच महिला आघाडीच्या शोभा फटांगडे, ज्योती दरंदळे,आशा वाळुंज,शीला इचके,मीना आखाडे,अपुर्वा वाळुंज,संगीता इचके,सुरेखा गावडे,रोहिणी वाळुंज, वटेश्वर महिला भजनी मंडळ,युवा कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि मोशी,संतनगर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फाउंडेशनने पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन आणि सर्व गणेश भक्तांचे आभार मानले असून, हा कार्यक्रमाची संकल्पना शोभा फटांगडे यांनी मांडली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती दरंदळे यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेउन विशेष मेहनत घेतली.पुढील काळात वृक्षारोपण आणि नदी स्वच्छता,गडकिल्ले, तिर्थक्षेत्र स्वच्छता,दुर्गम भागात फराळ ,कपडे वाटप,शालेय साहित्य वाटप,पर्यावरण जनजागरण मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले आहे.





