Uncategorizedसामाजिक

भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड २०२५-२६ गोव्यात संपन्न होणार !!

img 20260403 wa0626
img 20260403 wa0626

पंचनामा प्रतिनिधी पणजी (गोवा) – समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी “भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड 2025-26” या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कला अकादमी, कॅम्पाल, पणजी (गोवा) येथे करण्यात आले आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा सर्किट बेंच फाउंडेशन, डी. एस. राठोड फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून देशभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वेळी गौरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत पाठक (अतिरिक्त पोलीस आयुक्त – प्रशासन, ठाणे) तसेच श्री. कालिदास घाटवल (माजी संचालक, मेरा युवा भारत – युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) आणि श्री. मोहन गावंकर (संयुक्त सचिव, गोवा विधान सभा, पर्वरी) हे मान्यवर प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3 वाजता पाहुण्यांच्या नोंदणीने होणार असून स्वागत, परिचय व दीपप्रज्वलनानंतर आयोजकांचे मनोगत व्यक्त केले जाईल. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. सायंकाळी “भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड” प्रदान सोहळा होणार असून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विठ्ठल जाधव (IPS), डॉ. सुरेश राठोड (संचालक – डी. एस. राठोड फाउंडेशन) आणि डॉ. गुंडोपंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

fb img 1773887073740

समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे व सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Related posts

यशाच्या शिखरावर समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स; विद्यापीठ परीक्षेत विद्यार्थ्यांची दैदिप्यमान भरारी !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला !!

Chief Editor

बदलत्या हवामानाचा होतोय आंब्याच्या मोहोरावर परिणाम; गावरान सह कलमी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज !!

Chief Editor

Leave a Comment